← Trở về danh mục
HỒ SƠ TÀI LIỆU · #12.984
Chỉ metadata Tài liệu khác EN cc-by-4.0

महात्मा गांधीचे अहिंसा विषयक विचार

Năm xuất bản2023
Nguồn học thuậtZenodo
Định danhDOI 10.5281/zenodo.10125786
TRÍCH DẪN ĐỀ XUẤT

प्रा. डॉ. अशोक गंगाराम अंभोरे (2023). महात्मा गांधीचे अहिंसा विषयक विचार. Zenodo. https://doi.org/10.5281/zenodo.10125786

01

Tóm tắt

महात्मा गांधीचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील स्थान अत्यंत महत्वाचे आहे. महात्मा गांधी इ.स. 1893 ला दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. त्या दौऱ्यामध्ये काही काळ अफ्रिकेत असलेल्या काळया व गोऱ्या वर्णभेदा विरूध्द प्रथम आंदोलन केले व त्या ठिकाणी असलेल्या काळया लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. महात्मा गांधीच्या व्यक्तीमत्वावर कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मगुरू, धर्मग्रंथ यांची कोणतीही पूर्ण छाप दिसून येत नाही. त्यांनी काही तत्वे प्रेरणा आणि विचार आत्मसात करून हिंदू धर्मातील अध्यात्मवाद, जैन, बौध्द व वैष्णव पंथातील भूतदया, नितीमुल्य आणि पंचतत्वे, ख्रिस्तीधर्मातील मानवतावादी मुल्ये, आईच्या व्रताचरणाचा प्रभाव, भगवतगितेचा जीवनावर पडलेला प्रभाव त्यांना आपल्या आई वडील व आजोबाच्या सत्यनिष्ठा, व्यवहारकुशलता आणि सत्यनिष्ठा इ. गुणाचा वारसा रक्तातूनच मिळाला होता. त्यांच्या वर थोर विचारवंत स्क्रिन, टॉलस्टॉय आणि थोरो या विचारवंताचा प्रभाव महात्मा गांधीच्या जीवनावर पडला होता. महात्मा गांधीनी आपल्या विचारसरणीवर सत्य आणि अहिंसा या दोन तत्वाना महत्वपूर्ण स्थान होते. म्हणजेच महात्मा गांधीच्या सत्याच्या प्रयोगात अहिंसेचे महत्व सांगतांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अहिंसेच्या तत्वाचे पालन केले पाहिजे यावरून महात्मा गांधी आपल्या जीवनात अहिंसेला किती महत्व देत होते यावरून दिसून येते.

02

Thông tin thư mục

03

Từ khóa

महात्मा गांधी; अहिंसा